• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 9, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जळगाव दि.०८ – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते पाच स्क्वॅश कोर्टचे उद्घाटन व क्रिडा मशालीचे प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी जळगांव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष हर्षल चौधरी, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना व सचिव, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सहसचिव दयानंद कुमार, प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, ॲड.प्रमोद पाटील, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप खांडे, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदिप तळवेलकर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, प्रा. निलेश जोशी, रविंद्र चोथवे,डॉ. रणजित पाटील, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका, प्राचार्य प्रा.सं.ना.भारंबे, अशोक राणे, संदीप जगताप उपस्थित होते.

०८ मे ते ११ मे या कालावधीत एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॅश कोर्ट, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर या ठिकाणी होणार आहेत. यात महाराष्ट्रातील २० ते २५ जिल्ह्याचा सहभाग या स्पर्धेत असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातुन जास्तीत जास्त २० ते २५ खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेकरिता एकूण १२ पंच अधिकारी व ४ ते ५ संघटना पदाधिकारी आहेत. सदर स्पर्धा या जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असून या स्पर्धेत महाराष्ट्रातून ५०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी आहेत.

खान्देशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या पाच वर्षात ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, ०५ वूडन बेटमिटंन कोर्टस आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १० मी. शूटिंग रेंजनंतर आता भव्य व अद्ययावत अशा ०५ स्क्वॅश कोर्टसची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले, तर अध्यक्षीय मनोगत केसीई सोसायटी कोषाध्यक्ष डी. टी. पाटील यांनी व्यक्त केले. आभार डाॅ.रणजित पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव पाटील यांनी केले.

Next Post
राज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन परिषदेत पेपर सादरीकरणात डॉ.यशश्री देशमुख प्रथम

राज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन परिषदेत पेपर सादरीकरणात डॉ.यशश्री देशमुख प्रथम

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add