यावल, दि.०६ – यावल येथील नवीन वसाहतीत गणपतीनगर, आयेशा नगर, तिरुपतीनगर, चांदनगर वसाहतीला लागून असलेल्या नाल्याची साफ-सफाई होत नसल्याची तक्रार युवक काँग्रेस अध्यक्ष फैजान अब्दुल गफार शहा यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना गुरूवारी लेखी निवेदन देण्यात आले.
परिसरात असलेल्या नाल्यात घाण पाणी साचून आहे. या ठीकाणी नाल्याची सफाई झाली नाही, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्याची दुर्व्यवस्था झाली असून स्थानिक लोकांना डास, दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आयेशा मस्जिदला लागून असलेल्या नाल्याची सफाई न झाल्या मुळे नमाज पठणासाठी येणाऱ्या मुस्लीम बांधवांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन नाल्याची पाहणी करावी आणि लवकरात लवकर नाले सफाई करावी अशी मागणी होत आहे.
यावेळी निवेदन देताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैज़ान अब्दुल गफ्फार शाह, मुसतलीक शेख, शकील तडवी, जाबिर कुरेशी, रिजवान कुरेशी, नजीफ शेख, दानिश शेख, अनिस शेख आदी सदस्य व नागरिक उपस्थित होते.