जळगाव, दि.०६ – शाहू महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्या वतीने काव्यरत्नावली चौकात आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शाहू महाराजांच्या विचारामुळेच आज महाराष्ट्र हा सुजाण व सुबुद्ध लोकांचा प्रदेश आहे. यामुळेच विद्वेशाच्या या आवाजाला समाजात स्थान नाही. याचं कारण शाहू महाराजांचे सामाजिक एकतेचे विचार मनामनात आहेत असे मत व्यक्त केले.
सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्यावतीने शंभु पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी माजी आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, मुकुंद सपकाळे, जमील देशपांडे, दिपक सूर्यवंशी, पुरुषोत्तम चौधरी, विनोद देशमुख, अश्विनी देशमुख, सरिता माळी, शोभा चौधरी, विराज कावडिया, समितीचे राम पवार, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, खुशाल चव्हाण, फईम पटेल, वसंत गायकवाड, नितीन सोनवणे, सुरेश मराठे, भूषण गुरव, रवी जोशी, विकास वाघ, विजय पालवे, शरद पाटील आदी उपस्थित होते.