जळगाव, दि. ०६ – जामनेर बोदवड रस्त्यावरील राजकमल हाॅटेल समोर एक ईसम गावठी पिस्तुल कमरेला लाऊन दहशत माजवीत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. दरम्यान पथकाने लागलीच घटनास्थळी जात संशयीत आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत, वय २०, रा. जामनेर, हल्ली मुक्काम वरणगाव याला मंगळवारी ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी जात संशयित आरोपीला ताब्यात घेतले, दरम्यान त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलिस हेड काॅस्टेबल लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक विनोद पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर पाटील, अशोक पाटील आदी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन आरोपीवर कारवाई करण्यात आली. संशयितावर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नंबर १४५/२०२२ शस्त्र अधि. ३/२५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन पुढील तपास जामनेर पोलिस स्टेशन करीत आहे.