• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्कार प्रदान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 7, 2022
in मनोरंजन, सामाजिक
0
जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्कार प्रदान

नाशिक, दि.०७ – येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जलपुरुष राजेंद्रसिंग यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला. कवी कालिदास नाट्यगृहात हा सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे, जलपुरूश राजेंद्रसिंग, पालकमंत्री छगन भुजबळ, गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर पालकमंत्री छगन भुजबळ, राजन गवस, गुरू ठाकूर, नीलिमा मिश्रा या मान्यवरना देखील ‘गिरणा गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला असून गिरणा गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो. या वर्षांपासून तो नाट्यक्षेत्रातील रंगकर्मीना द्यायची सुरवात शंभु पाटील यांच्या पासून करण्यात आली. गिरणा काठावर कुवारखेडा गावच्या रंगकर्मीला मिळालेल्या या “गिरणा पुरस्कारा”च मोल मला अधिक आहे. ज्या नदीच्या पाण्यावर माझं भरण पोषण झालं, त्या नदीच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला याचं श्रेय परिवर्तन जळगाव परिवाराला आहे. परिवर्तनने केलेले सृजनशील उपक्रम या मुळेच माझा सन्मान झाला अशी प्रतिक्रिया शंभु पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी कवी राजू देसले, कवी प्रकाश होळकर, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडे, सिंधुताई सपकाळ, भवरलालभाऊ जैन, डॉ. मोहन आगाशे, ऍड. उज्वल निकम, रतनलाल सी. बाफना, लेखक रंगनाथ पठारे आदि मान्यवरांना या पूर्वी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

Next Post
विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेची मागणी

विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा - युवासेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ

February 4, 2023
लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट

February 4, 2023
कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप
जळगाव जिल्हा

कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप

February 3, 2023
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

February 2, 2023
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव जिल्हा

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

February 1, 2023
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.