जळगाव, दि.०१- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगावात रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राजस्थान मध्ये घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येसंदर्भात माहिती देत या घटनेचा निषेध करण्यात आला.
राजस्थान येथील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अर्चना शर्मा यांच्या रुग्णालयात प्रसुती दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान डॉक्टर अर्चना शर्मा यांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचा नातेवाईकांनी ठपका ठेवत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव आणला होता, दरम्यान आपल्यावर होणारे आरोप सहन न झाल्याने डॉक्टर अर्चना शर्मा यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले.
या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डाॅ.सुहास पिंगळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत, निषेध व्यक्त केला. तसेच संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.
ही दुर्दैवी घटना एक अंतिम घटना म्हणून समजतो आणि अशी भविष्यात कोणतीही घटना झाल्यास आम्ही आमच्या सेवा त्वरित काढू आणि बंद करू असा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डाॅ.सुहास पिंगळे, सचिव डाॅ.मंगेश पाटे, डाॅ.उल्हास पाटील, डाॅ.स्नेहल फेगडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या –
१) जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा.. २) दिवंगत डॉ अर्चना शर्मा यांच्या पीडित कुटुंबाला पुरेशी भरपाई.. ३) डॉक्टरांवरील हिंसाचारासाठी केंद्रीय कायद्याची बहुप्रतीक्षित गरज.. ४) वैद्यकीय व्यवसायाला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आयपीसी मध्ये बदल.. ५) वैद्यकीय व्यवसायाला सीपीए आणि नुकसानभरपाईच्या कॅपिंगमधून सूट.. ६) दिवंगत डॉ.अर्चना शर्मा यांच्या अपमानास जबाबदार असल्याबद्दल स्थानिक राजकारण्यांवर कठोर कारवाई..
VIDEO