अमळनेर, दि.३०- तालुक्यातील मांडळ येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याची राज्यात पहिलीच घटना समोर आली आहे. शेतकरी जितेंद्र संजय माळी यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असुन त्याने भर उन्हात दिवसभर शेतात काम केले.
संध्याकाळी त्याला शेतातच चक्कर आल्याने नातेवाईक व मजुरांनी त्याला खासगी डॉक्टरांकडे नेले. प्रथमोपचार करून जितेंद्रला अमळनेरला नेत असताना तो बेशुद्ध पडला; यातच त्याचा मृत्यु झाला.
दरम्यान जितेंद्र हा उष्माघाताचा पहिला बळी ठरला असून ग्रामीण रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याला उष्माघात सदृश्य लक्षणे होती व मेंदूत रक्तस्राव झाला असल्याचे डॉ.आशिष पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील तापमान ४१ अंशाच्या वर गेल्याने नागरिकांनी काळजी घेणे तितकेच महत्वाचे असून जिल्हा प्रशासन देखील करण्यात येत आहे.