जळगाव, दि. १० – ओबीसी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी दिनांक १२ मार्च रोजी ओबीसी सहविचार सभा व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन जळगावात करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी ओबीसी महासंघाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.
दरम्यान कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी.डी.पाटील यांनी दिली. यावेळी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
VIDEO