• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कालानुरूप बदललेला महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद.. – महापौर जयश्री महाजन

जिल्हा पत्रकार संघातर्फे माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 8, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
कालानुरूप बदललेला महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद.. – महापौर जयश्री महाजन

जळगाव, दि. ०८ – सामान्य जनतेसाठी लोकलढा महिला पत्रकारितेतून उभा राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कालानुरुप बदललेली पत्रकारिता आणि या बदलत्या पत्रकारितेत महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद आहे. ही बाब अतिशय अभिमानाची असल्याचे गौरोवोद्गगार महापौर जयश्री महाजन यांनी काढले. दरम्यान जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा मंगळवारी पत्रकार भवनात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला पत्रकार शांता वाणी, प्रमुख अतिथी भावना शर्मा, लिना पाटील यांच्यासह विश्‍वस्थ अशोक भाटीया, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. गोपी सोरडे, सरचिटणीस पांडुरंग महाले उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन झाल्यानंतर माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

शांता वाणी यांनी अध्यक्षीय समारोप केला. शुभदा नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.गोपी सोरडे यांनी केले. सुत्रसंचालन यामिनी कुळकर्णी यांनी तर आभार मनिष पात्रीकर यांनी मानले. कार्यक्रमाला चंदू नेवे, विश्वजीत चौधरी, जितेंद्र कोतवाल, किशोर पाटील, सचिन पाटील, भूषण हंसकर, गोकुळ सोनार, जुगल पाटील, शिवलाल बारी, अनिल केर्‍हाळे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

या माध्यमकर्मींचा सन्मान
शांता वाणी, भावना शर्मा, शुभदा नेवे, सरिता खाचणे, धनश्री बागुल, लीना पाटील, मुनिरा तरवारी, गौरी बारी, वैशाली पाटील, सोनम पाटील, गौरी जोशी, पुष्पा पाटील, सुवर्णा पाटील, सुनिता कोतवाल, प्रा.केतकी सोनार, जयश्री निकम, वर्षा लोहार, कविता ठाकरे, पल्लवी सोनवणे, विमल कोळी, शालिनी कोळी, जागृती भावसार, यामिनी कुलकर्णी, सविता कानडे, पत्रकार पतीला जीवदान देणाऱ्या शारदा केर्हाळे, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारप्राप्त प्रेमलता पाटील, कमी वयात पुस्तक लिहिणार्‍या सफिना सैफी यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Next Post
‘सुहिणा सिंधी जग जो शान’ नृत्य नाटीकेचे सादरीकरण

‘सुहिणा सिंधी जग जो शान’ नृत्य नाटीकेचे सादरीकरण

ताज्या बातम्या

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार
जळगाव जिल्हा

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

May 6, 2026
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा
गुन्हे

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

May 6, 2026
भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
गुन्हे

भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

May 6, 2026
सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group