• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून शिवकालीन शिवजयंती साजरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 19, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून शिवकालीन शिवजयंती साजरी

जळगाव, दि.१९ – रोटरी क्लब च्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पायी मिरवणूक काढण्यात आली. मावळे, सरदार, पेशवे, भालदार अशी पोशाख घातलेले सदस्य मिरवणुकीत सहभागी होते. कोर्ट चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ महाराजांचे आयुष्य चित्र स्वरूपात उभे करण्यात आले असून त्यावर संपूर्ण बुरुजाचा देखावा तयार करण्यात आला.

शिवतीर्थ मैदाना पासून ते महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.

शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व आरती पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक तथा शिवशाहीर दादा नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवजयंती साजरी करण्यात आली. रोटरॅक्ट च्या माध्यमातून शिवकाळ उभा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांना वंदन करत शाहिरी पोवड्याने करण्यात आली. शाहीर संग्राम जोशी व संदीप जोशी यांनी महाराजांवरील पोवाडा सादर केला.

रोटरॅक्टच्या माध्यमातून क्लबचे माजी अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणले. पंकज जैन, तरुण अर्तानी, निरंजन देशमुख, देवयानी रसाळ, नितीन नेवे, कृणाल सोनार, प्रा.राजेंद्र देशमुख, लक्ष्मीकांत अडावदकर, स्वप्नील नेवे, सुरेश नेवे, चिन्मय जहागीरदार, विनोद नेवे, संजय कोरके, अजय नेवे, नवीन दलाल, भिकू झवर, जगदीश नेवे आदींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

 


 

Next Post
कुसुंब्यात अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी VIDEO

कुसुंब्यात अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी VIDEO

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add