जळगाव, दि. १९ – तालुक्यातील कुंसुंबा येथे अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. तसेच स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवाचा सजीव देखावा व शिवजन्मोत्सव गित सादर केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
त्याचबरोबर शिवजयंती निमित्त कुंसुंबा येथील दत्तमंदीरात अल्पदरात शासकिय योजना शिबीर राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, ईश्वर पाटील, वसंत पाटील आदींसह ग्रामस्थ तथा शिवभक्त उपस्थित होते.
VIDEO