पाचोरा, दि.०८ – येथील जनता प्रबोधन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभरात गोरगरीबांना अन्न वस्त्र निवाराचे सहकार्य केले जात असून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. सध्या संस्थेचे कार्य जिल्हाभरात वाढत असून प्रत्येक तालुक्यातील व शहरातील विविध उपक्रम राबविण्यासाठी युवक व सामाजिक कार्य करण्याची आवड असणाऱ्या तरुणांची विविध पदांवर निवड केली जात आहे.
दरम्यान पाचोरा येथील अमजद खान मजीद खान यांची मंगळवारी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मित्रपरिवाराने खान यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
समाजसेवक अमजद खान मजीद खान हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून त्यांच्या सामाजिक कार्याची व सामाजिक जन जागृतीची संस्थेच्या वतीने दखल घेत त्यांची नियुक्ति करण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले.
भविष्यात संस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व संस्थेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन विविध उपक्रम राबवून समस्याचे निवारण करावे व संस्थेचे संघटन बळकट करावे असे संस्थेच्या वतीने त्याना सांगण्यात आले. त्याच बरोबर पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.