जळगाव, प्रतिनिधी : शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस पथकाने आसोदा शिवारातून तीन संशयितांना अटक केली आहे.

सुरेखा कैलास पंधारे (वय ५०, रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच जण त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी सुरेखा पंधारे यांचा मुलगा केयूर कैलास पंधारे याला जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली, तर दुसऱ्या व्यक्तीने तलवार काढून दहशत पसरवली.

या घटनेप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना केले होते. पोलिसांनी आसोदा शिवारातून तीन संशयितांना अटक केली आहे.









