• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित इंडक्शन कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण, संस्थेची कार्यपद्धती आणि आगामी शैक्षणिक वाटचालीची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत सोलंकी आणि डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज रजिस्ट्रार प्रमोद भिरूड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रशांत सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक कार्याची तसेच संस्थेच्या आजवरच्या प्रेरणादायी वाटचालीची सविस्तर माहिती दिली. संस्थेने शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात निर्माण केलेले योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमोद भिरूड यांनी नवीन शैक्षणिक सत्राचे स्वरूप स्पष्ट करताना अभ्यासाचे योग्य नियोजन, प्रभावी अध्ययन पद्धती, वेळेचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक जीवनात यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी संपूर्ण वर्षभरात महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर उपक्रमांची माहिती दिली. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांमधील महाविद्यालयीन जीवनाबद्दलचा संकोच दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, संस्थेच्या परंपरा व मूल्यांची ओळख करून देणे आणि त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्याचा पाया घालणे, हा या इंडक्शन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


 

Next Post
राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

ताज्या बातम्या

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी
खान्देश

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू

November 19, 2026
लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून
गुन्हे

लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

November 18, 2026
जळगाव महापालिकेची बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करा; उपमहापौरांचे निर्देश
खान्देश

जळगाव महापालिकेची बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करा; उपमहापौरांचे निर्देश

November 18, 2026
रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश
खान्देश

रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश

November 18, 2026
रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी अनंत भोळे यांची निवड
जळगाव जिल्हा

रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी अनंत भोळे यांची निवड

November 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add