• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

जळगांव येथे २२ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

जळगाव, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील महाकवी कालिदास सभागृह मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव व परिसरातील नाट्यरसिकांना दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार व इंदोर जिल्ह्यातील एकूण १५ नाट्यसंस्था प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे.
यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे.

महाकवी कालिदास सभागृह..
मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


 

ताज्या बातम्या

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी
खान्देश

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू

November 19, 2026
लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून
गुन्हे

लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

November 18, 2026
जळगाव महापालिकेची बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करा; उपमहापौरांचे निर्देश
खान्देश

जळगाव महापालिकेची बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करा; उपमहापौरांचे निर्देश

November 18, 2026
रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश
खान्देश

रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश

November 18, 2026
रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी अनंत भोळे यांची निवड
जळगाव जिल्हा

रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी अनंत भोळे यांची निवड

November 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add