• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

पाळधी-तरसोद वळण मार्गावरील अपघात; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

जळगाव, (प्रतिनिधी) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मध्य प्रदेशातील दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २२) रात्री सुमारे एकच्या सुमारास पाळधी ते तरसोद वळण मार्गावर, असोदा उड्डाणपुलाजवळ घडला. या घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील बिरोदा येथील युवराज भिका सोनवणे (वय ३४) आणि पवन अनिल चौधरी (वय २९) हे दोघे मित्र दुचाकीने (एमपी ६८ झेडडी ९२३२) सुरत येथे जात होते. जळगाव शहरात आल्यानंतर ते तरसोद-पाळधी बाह्यवळण मार्गाने पुढे जात असताना असोदा उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की दुचाकीच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी कुमुद अनिल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेलेल्या अज्ञात वाहनाचा तसेच चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Next Post
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

ताज्या बातम्या

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
खान्देश

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 24, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
गुन्हे

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add