• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

जयनगरातील घटना; रामानंदनगर पोलिसांत  गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

जळगाव प्रतिनिधी  घरमालक दाम्पत्य नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी गेले असताना मोलकरणीने घरातील कपाटातून ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच बँक लॉकरची चावी चोरून नेल्याची घटना जयनगर भागात रविवारी (ता. २०) घडली. या प्रकरणी गायत्री बापू पाटील (रा. हरिविठ्ठलनगर) हिच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयनगर येथील स्वाती नीलेश झवर या पतीसह रविवारी नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी गेल्या होत्या. त्याच दिवशी धुणीभांडी व साफसफाईच्या कामासाठी गायत्री पाटील त्यांच्या घरी आली होती. दाम्पत्य बाहेर गेलेले असताना तिने कपाटातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन कॉईन, ४ ग्रॅम वजनाचे दोन टॉप्स आणि १ ग्रॅम वजनाच्या नाकातील तीन फुली, असे एकूण ५५ हजार रुपये किमतीचे दागिने तसेच बँक लॉकरची चावी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
स्वाती झवर घरी परतल्यानंतर कपाटातील दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी याबाबत सासूकडे विचारणा केली. त्यावेळी गायत्री पाटील बेडरूममध्ये गेली होती व तिने दरवाजा लोटला होता, अशी माहिती सासूने दिली. त्यानंतर स्वाती झवर यांनी २२ तारखेला रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गायत्री पाटील हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
खान्देश

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 24, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
गुन्हे

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add