• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

रावेरमध्ये दिवसा घरफोडी; ५० हजारांची रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 23, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

रावेर प्रतिनिधी शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरात दिवसा बंद घराचे कुलूप तोडून ५० हजार रुपयांची रोकड आणि तीन तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित हा घरमालक महिलेचा भाचा असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने मावशी घरात एकटी राहत असल्याची माहिती असल्याने मित्राच्या मदतीने घरफोडी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
मधुसूदन मेडिकलसमोर राहणाऱ्या कल्पना सुभाष वाणी (वय ५२) या अंगणवाडी सेविका आहेत. २० सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता त्या घराला कुलूप लावून कामानिमित्त अहिरवाडी येथे गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास त्या परतल्यानंतर घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आढळला. घरातील सामान अस्ताव्यस्त होते. कपाट तपासले असता ५० हजार रुपये रोख, दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका कॅमेऱ्यात संशयितांचे चेहरे स्पष्ट दिसून आल्याने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

रितेश रवींद्र नेवे (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, जळगाव) आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. ममुराबाद, जळगाव, ह.मु. सिलवासा) यांना २१ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत रितेश हा कल्पना वाणी यांचा भाचा असल्याचे समोर आले. कौटुंबिक कारणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये काही वर्षांपासून संपर्क नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

मावशी सकाळी कामानिमित्त घराबाहेर जाते आणि घरात ती एकटी राहत असल्याची माहिती रितेशला होती. त्याने मित्राच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे पोलिस तपासात समोर आले. न्यायालयीन आदेशानंतर पोलीस कोठडीत चौकशी केली असता पोलिसांनी ५० हजारांची रोकड आणि तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि हरिदास बोचरे, तसेच श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी व विकार शेख यांच्या पथकाने केली. पुढील तपास सपोनि हरिदास बोचरे करीत आहेत.


 

Next Post
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
खान्देश

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 23, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
खान्देश

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 23, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक

September 23, 2026
गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट
गुन्हे

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट

September 23, 2026
पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
जळगाव जिल्हा

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add