• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

२५ सप्टेंबरला सायंकाळी ६ पासून २६ सप्टेंबर दुपारी १२ पर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 24, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

जळगाव, प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत काही मार्ग अवजड वाहने, एसटी बसेस, कार तसेच दुचाकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सेशन कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, टॉवर चौक, भीलपुरा मार्गांवरून होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हे बदल करण्यात येत आहेत.

जळगाव-पाचोरा मार्गावरील एसटी बसेससह अन्य वाहतुकीसाठी शिरसोली रोडचा पर्यायी वापर करण्याचे नियोजन आहे. जड व मध्यम वाहनांसाठी इच्छादेवी चौकी, गणेश घाट परिसर आणि शिरसोली रोडमार्गे वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद आहे.

पाचोऱ्याकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यावल, चोपडा, कानळदा, भोकर आदी भागांतून येणाऱ्या एसटी बसेस व इतर वाहनांसाठीही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दूध फेडरेशनकडील रेल्वे फाटक क्रमांक १४८ बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी बसेस, अवजड वाहने, कार व दुचाकींसाठी शिवाजीनगर रेल्वे पुलाचा तसेच कानळदा रोडवरील रेल्वे पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हलकी व लहान वाहने तसेच दुचाकींसाठीही उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीच्या काळात पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

Next Post
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

ताज्या बातम्या

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add