जळगांव, दि. 22 – जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डिजिटल माध्यमाद्वारे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान सभासद नोंदणी अभियान अधिक सुलभ व जलद गतीने होण्यासाठी जळगावात शनिवारी पक्ष कार्यालयात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले. सदस्य नोंदणी कशाप्रकारे करावी, नोंदणी अधिकारी, त्यांची कार्यपद्धती व जबाबदारी विषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष एडव्होकेट संदीप पाटील, सुलोचना वाघ, डी डी पाटील, जमाल शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.