• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

जळगाव, दि.22 – कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर नितीन लढ्ढा, बांधकाम व्यावसायीक अनिष शहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते.

माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या कोरोना काळासह विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली. जैन उद्योग समूहाव्दारे गरजुंची भोजनाची व्यवस्था असो की, शहरातील कोणतेही समाजपयोगी कार्य असो जैन उद्योग समूह नेहमी अग्रेसर असतो. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या दातृत्व भावनेतुन स्नेहाची शिदोरी हा उपक्रम सुरू असुन आवश्यकता असणाऱ्यांसाठी तो अपेक्षापूर्तीचा ठरत असल्याचे नितीन लढ्ढा म्हणाले. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो मात्र संघर्षाच्या काळात मदतीचा हात देणारे खरे औदार्याचे धनी असतात.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील यांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना अशोक जैन यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार होत नसल्याने संभाव्य उपासमारीचे गांभीर्य सांगितले त्यानुसार त्यांनी तत्काळ मदतीचा हात दिल्याचे विजय पाटील कृतज्ञतापुर्वक म्हणाले. या एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मोफत नेत्रतपासणी करण्याची घोषणा यापुर्वीच केली आहे. जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांनी स्नेहाची शिदोरी या उपक्रमाविषयी अवगत करत आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सहकारी यांनी सहकार्य केले.

Next Post
युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group