• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे यारी रॅगींग विरोधी युवा मोहीम या संकल्पनेअंतर्गत अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करून सुरक्षित, सन्मानपूर्ण, मैत्रीपूर्ण आणि रॅगिंगमुक्त कॅम्पस निर्माण करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश होता.

डॉ. अक्षता पाटील हॉल येथे उद्घाटन समारंभ व अँटी-रॅगिंग शपथविधीने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. शैलेश रविकांत नागला,एलएलएम यांच्या हस्ते झाले. नागरी व फौजदारी कायद्याच्या क्षेत्रातील १३ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे कायदेशीर परिणाम, त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम तसेच रॅगिंग रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी रॅगिंगविरोधी शपथ घेत रॅगींगला नकार दयाचा संदेश दिला.सप्ताहाच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थी संवाद व रॅगिंग प्रतिबंध जनजागृती उपक्रम घेण्यात आला. रॅगींगला नकार दया या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अँटी-रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून रॅगिंगविरोधी जनजागृती केली. अँटी-रॅगिंग लोगो डिझायनिंग व फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आल्यात. सप्ताहाच्या समारोपानिमित्त शॉर्ट फिल्म सादरीकरण, प्रमाणपत्र वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून रॅगिंगचे गांभीर्य, त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम आणि रॅगिंगमुक्त वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.अँटी-रॅगिंग सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रॅगिंगला नाही, मैत्रीला होकार हा संदेश देत सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

Next Post
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

ताज्या बातम्या

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी
जळगाव जिल्हा

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add