• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

जळगाव, प्रतिनिधी : अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या ४२ वर्षीय रुग्णावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णावर वेळेचे महत्त्व ओळखून तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही काळ रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासली. मात्र अवघ्या तीन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होऊन तो सामान्य स्थितीकडे परतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय सुरेश यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. नातेवाईकांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने सीटी स्कॅन केला.सीटी स्कॅनच्या अहवालात मेंदू आणि कवटीच्या खाली मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाले

रक्तस्त्रावामुळे मेंदूवर मोठा दाब निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णाची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत विलंब झाल्यास मेंदूला कायमस्वरूपी इजा होण्याचा तसेच जीवाला धोका निर्माण होण्याचा संभव असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे यांच्या पथकाने ‘डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी’ ही अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यासाठी आवश्यक उपचार करण्यात आले तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात आली. गंभीर अवस्थेतील रुग्णावर वेळ न दवडता करण्यात आलेल्या या तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत झाली.

शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. साक्षी, डॉ. सुश्मिता यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर सातत्याने उपचार करण्यात आले. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांत रुग्णाची प्रकृती सुधारली आणि त्याने सामान्य स्थितीकडे वाटचाल सुरू केली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत संपूर्ण मोफत करण्यात आल्याने रूग्णाच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासाही मिळाला.

▪️डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. या रुग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव व मेंदूवर दाब दिसून आला. त्यामुळे विलंब न करता डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील उपचार आणि सतत निरीक्षणामुळे रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली.

– डॉ. श्रृती खंडागळे, निवासी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add