• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

हॉटेलमधील वादातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; पिस्तूल जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2026
in खान्देश, गुन्हे
0
यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

हॉटेलमधील वादातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; पिस्तूल जप्त

यावल प्रतिनिधी

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे भरचौकात पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत पसरवणाऱ्या कोळन्हावी ग्रामपंचायतीचा सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) याला यावल पोलिसांनी अटकाव केला आहे. संशयिताच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

२७ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डांभुर्णीतील किनगाव रोडलगत शिवसम्राट बिर्याणी दुकानाजवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने रिकामी पुंगळी जप्त केली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपी गोटू सोळंके यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर संशयित जळगावकडे पसार झाल्याची माहिती मिळताच यावल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कालंका माता मंदिर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, डांभुर्णीतील काही तरुण आपल्या हॉटेलमध्ये येऊन व्हिडिओ काढून त्रास देत असल्याने, त्यांच्यात दहशत बसवण्यासाठी गोळीबार केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीच्या माहितीवरून कोळन्हावी शिवारातील त्याच्या शेतातून लपवून ठेवलेले पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२५ व आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद पुढील तपास करत आहेत.

Next Post
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add