• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

३० ऑगस्टला कोथळीत अभीष्टचिंतन सोहळा; शरद पवार, प्रकाश आंबेडकर, विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या अमृत महोत्सवी ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अध्यात्म, भक्ती आणि वारकरी परंपरेचा भव्य सोहळा सुरू आहे. अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ यामुळे कोथळी परिसर भक्तिमय झाला असून, रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

खडसे यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सोहळ्याला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी कोथळी येथे उपस्थित राहणार आहेत. ते आमदार एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा देऊन श्री संत मुक्ताई मंदिराचे दर्शनही घेतले. रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार चैनसुख संचेती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस यांच्यासह अन्य मान्यवरही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकनाथराव खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक वाटचालीला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी टप्प्यावर शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय विचारसरणींचे नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, संत मुक्ताई चरित्र आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांची उपस्थितीही वाढत असून, मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी परिसरात जय्यत तयारी सुरू आहे.


 

Next Post
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add