• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेला लागून असलेल्या खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या विविध प्रश्नांबाबत जळगाव शहर हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी हॉकर्सच्या समस्या जाणून घेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

निवेदनानंतर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस राहुल पाटील, तसेच उपायुक्त गोसावी यांच्या उपस्थितीत मनपा परिसरालगत असलेल्या खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी खाऊ गल्लीतील हॉकर्स तसेच विविध हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सन २०१४ पर्यंत नोंदणीकृत असलेले तसेच नोटरीधारक हॉकर्स यांच्याबाबत विशेष विचार करण्यात आला. संबंधित हॉकर्सना गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस उपलब्ध जागेत व्यवस्थितपणे बसविता येईल का, याबाबत मनपा आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तसेच हॉकर्सना व्यवसाय करताना टेबल-खुर्च्या न ठेवता केवळ गाड्यांद्वारे व्यवसाय करता येईल का, याबाबतही मनपा प्रशासन, पदाधिकारी आणि हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

“हॉकर्सचा व्यवसाय आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कायम ठेवत जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासन आणि हॉकर्स यांच्यात समन्वय साधून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

हॉकर्सच्या उपजीविकेचा प्रश्न आणि शहराच्या स्वच्छतेचा समतोल साधण्यासाठी मनपा प्रशासन व हॉकर्स संघटनांमध्ये समन्वयाने तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, शुभम जाधव यांच्यासह खाऊ गल्लीतील हॉकर्स उपस्थित होते.

Next Post
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add