जळगाव, दि.19 – जिल्हा शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत आहार सेवा पुरवण्याचा मक्ता नाशिक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सहकारी संस्थेने घेतला आहे. मात्र संबंधित संस्था रुग्णांना आहार देत नसल्याची तक्रार आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष विजय निकम यांनी केलीये. दरम्यान जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचं निकम यांच म्हणणंय.
यासंदर्भात निकम यांनी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ भोये यांच्यासह संचालक मंडळाला विरुद्ध गुन्हा दाखल करून घेणे बाबत मंगळवारी तक्रार अर्ज दिला. त्याच प्रमाणे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील निवेदनाची प्रत पाठविलीये.
पाहूया नेमकं काय म्हणण आहे विजय भीमराव निकम यांच..