• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
‘दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’

देवेंद्र पाटील | जळगाव, दि. 19 – आरोग्यसमृद्ध जगणं प्रत्येकाला अपेक्षित असते, मात्र काहींच्या पदरी आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि जगणं निराशादायक होतं. शरिराच्या महत्त्वाच्या इंद्रियांपैकी एक म्हणजे डोळा. दृष्टिदोषामुळे अनेकांचे खच्चीकरण होते तर काहींच्या जीवनात कायमचा अंधारही होतो. नेत्रदान करून आजही सृष्टीची चेतना अनुभवणाऱ्या ‘कांताई’ यांच्या नावाने असलेले ‘कांताई नेत्रालय’ रूग्णांचे ‘दृष्टी’ दोष दूर करत आहे आणि अंधारमय झालेल्या जीवनात प्रकाशाची किरणे पोहचवित आहेत. मानसिक स्वास्थासह सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवित आहे. आज कांताई नेत्रालयाचा सहावा वर्धापन दिन.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यकक्षेतील अत्यंत महत्त्वाचे अंग असलेल्या कांताई नेत्रालयाची सुरवात दि.19 जानेवारी 2016 रोजी करण्यात आली. कांताई नेत्रालयाने अवघ्या सहा वर्षात महाराष्ट्रात लौकिक प्राप्त केलाय. वैद्यकीयदृष्ट्याच नव्हे तर सर्वांगिण स्तरावर नेत्ररूग्णांचे आधारवड म्हणून कांताई नेत्रालय नावारूपास आले आहे. 17 हजार 118 शस्त्रक्रिया आणि दोन लाखाच्यावर नेत्र तपासण्या आणि जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील गरजू नेत्र रूग्णांपर्यंत पोहचण्याकरिता वेळोवेळी 750 हून अधिक नेत्र चिकित्सा शिबीर आयोजन करण्यात आले व त्याव्दारे 70 हजाराहून नेत्र तपासण्या आणि 8 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे आकडे कांताई नेत्रालयाच्या कार्यकक्षा उंचावणारेच आहेत.

कांताई नेत्रालयात डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार, त्यावरील शस्त्रक्रिया अत्याधुनिक यंत्रणेसह गुणवत्तापूर्ण सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या मेट्रो सिटीमध्ये न जाता कांताई नेत्रालयात वेळेत यशस्वी उपचारासह होत आहेत. अलिकडेच कांताई नेत्रालयात अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज रेडिना विभागाची सुरूवात करण्यात आली असुन अतिशय क्लिष्ट रेटिना शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्या आहेत.

कांताई नेत्रालयात सर्वप्रकारच्या नेत्रसेवा दिली जात असतानाच गोरगरिबांना सवलतीच्या दरात देखील शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जातात. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना अतुल जैन (एमबीबीएस, एम.एस.) या स्वत: रेटिना सर्जन आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. भावना जैन यांच्यासह अन्य चार तज्ज्ञ डॉक्टरसह सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी), डायग्नोस्टीक विभाग व वॉर्ड अशा विविध विभागात सुमारे 40 सहकारी दृष्टीदोष दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. सुसंवादासह पारदर्शकतेवर भर देणाऱ्या कांताई नेत्रालयाने काळानुरूप अत्यावश्यक असणारी यंत्रणा नेत्रालयात आणली. कांताई नेत्रालयाच्या स्थापनेपासूनच याठिकाणी सर्व उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. त्यात केवळ मोतीबिंदूच नव्हे तर काचबिंदू, लहान मुलांमधील दृष्टीदोष, तिरळेपणा, कॉर्नया (बुबळासंबधी उपचार) व अन्य स्वरूपांच्या सर्व नेत्र विकारांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या जातात.

अत्याधुनिक आय केअर आॕप्टीकल
‘आय केअर ऑप्टीकल’ या चष्माच्या अत्याधुनिक दालनाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण चष्मे बनविले जातात. आय केअर ऑप्टीकलच्या माध्यमातून आतापर्यंत 32 हजारापेक्षा जास्त चष्मे तयार करून वितरीत करण्यात आले आहेत.

जिल्हाबाहेरही तपासणी केंद्राची स्थापना
संपूर्ण खान्देश तसेच संलग्न जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारत असताना कांताई नेत्रालयाने कायमस्वरूपी तपासणी केंद्राची (व्हिजेन सेंटर) निर्मितीसुद्धा केली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तर जालना जिल्ह्यातील परतूर यांचा समावेश आहे. याठिकाणी रूग्णांची तपासणी केली जाते आणि आवश्यक असेल तर पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविले जाते.

मुलांसाठी ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरेटी’
कांताई नेत्रालयामध्ये आता नव्याने ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरेटी’ विभाग सुरू झाला आहे. ज्या मुलांचा प्रसूतीकाळ पुर्ण करण्यापूर्वीच म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यात जन्म होतो. त्यांचा रेटिना पुर्णपणे विकसीत होत नाही किंवा त्यात दोष उत्पन्न होऊ शकतो अशा मुलांना पुढे सातत्याने डोळ्यातील मागील पडदाची (रेटिना) यांच्या तपासणी वारंवार कराव्या लागते व गरज भासल्यास लेझर उपचार करावे लागतात. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे जळगाव जिल्ह्यातील कांताई नेत्रालयाद्वारे पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनाकाळातही कृतज्ञापुर्वक सामाजिक बांधिलकी..
कांताई नेत्रालयाने कोराना काळातही शासनाच्या सर्व नियमावलींचे पालन करून सेवा दिली. त्यात कोवीड लसीकरण केंद्र सुरू केले. 5 मार्च 2021पासून ते आजपावोतो 20 हजारापेक्षा जास्त नागरिकांची लसीकरण पुर्ण केले. हे कार्य अजूनही सुरूच आहे. कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून शहरातील कॉलन्यांमध्ये कोवीड संसर्गाचे संभाव्य रूग्ण आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास 4 हजाराच्यावर घरांमधील नागरीकांची तपासणी करण्यात आली. तसेच जैन हेल्थ केअरच्या माध्यमातून वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता विटॅमीन-C, विटॅमीन-B आणि इतर मल्टीविटॅमीन औषध वाटप करण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याकाळात ऑक्सीजनचा पुरवठा आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना घरीच उपलब्ध व्हावा यासाठी ऑक्सीजन कॉन्सटेटरची सुविधा मोफत उपलब्ध करून देत कोरोना काळातही सामाजिक बांधिलकी कांताई नेत्रालयाने जोपासली.

कांताई नेत्रालयात लवकरच नेत्ररोपणाची सुविधा
श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या आशिर्वादातून डोळ्यांशी संबंधित सर्व रोगांवर कांताई नेत्रालय स्थापनेपासून उपचार आणि शस्त्रक्रिया करित आहे. यात आता नव्याने रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरेटी विभाग सुरू झाला असून लवकरच नेत्ररोपणाची (आय ट्रान्सप्लांट) सुविधा कांताई नेत्रालयाद्वारे उपलब्ध केली जात आहे त्याकरिता आवश्यक असलेले दिर्घअनुभवी कॉनिर्या सर्जन आता कांताई नेत्रालयात पुर्ण वेळ उपलब्ध आहेत. -डॉ. भावना अतुल जैन  संचालिका, कांताई नेत्रालय

Next Post
शासकीय रुग्णालयात रुग्णांना आहार मिळत नसल्याची तक्रार  VIDEO

शासकीय रुग्णालयात रुग्णांना आहार मिळत नसल्याची तक्रार VIDEO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक
जळगाव जिल्हा

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक

June 6, 2023
शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद
कृषी

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

June 4, 2023
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
जळगाव जिल्हा

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

June 4, 2023
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

June 4, 2023
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज
कृषी

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

June 4, 2023
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.