जळगाव, दि.19 – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येत्या ३१ जानेवारीपर्यंत नाक-कान-घसा तपासणी शिबिर सुरु आहे. तज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची तपासणी तसेच एकाच छताखाली असलेल्या पॅथॉलॉजीसह अन्य चाचण्यांच्या कक्षाद्वारे रुग्णाच्या आजाराचे निदान आणि उपचार केले जात आहे.
या शिबिरांतर्गत नाकातील कोंब काढणे, नाकाचे वाढलेले हाड, सायनस त्रास, नासु, कानाचे सडलेले हाड काढणे, कानाचा पडदा बदलविणे, थायरॉईड आदि विकारांवर उपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहे. तसेच काही शस्त्रक्रिया ह्या दुर्बिणीद्वारेही केल्या जातात.
येथे रुग्णांना कान, नाक, घसा तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे, रेसिडेंट डॉ.श्रृती खंडागळे, डॉ.हर्षल महाजन हे तज्ञ डाॅक्टर सेवा देत आहे. रुग्णांनी सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड आणावे आणि विकारमुक्त व्हावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ.श्रृती खंडागळे मो. क्र. ८२०८९०९४५६, डॉ.हर्षल महाजन मो.क्र. ९९२०८५५३५३ यावर संपर्क साधावा.