• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

१५ दिवसांनी पाणी, तेही दूषित; अजिंठा महामार्गावर रास्तारोको, ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 15, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

जळगाव, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र सुरू असताना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मात्र महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. गावात गेल्या अनेक दिवसांपासून तब्बल १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, त्यातही दूषित पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी अजिंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. महिलांच्या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक ठप्प झाली.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-15-at-12.21.42-PM.mp4
https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-15-at-12.21.41-PM.mp4

कुसुंबा ग्रामपंचायतीकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तब्बल १५ दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच मिळणारे पाणी दूषित असल्याचा आरोप महिलांनी केल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने अखेर महिलांनी थेट महामार्गावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.

गावातील नागरिकांना किमान सहा दिवसांच्या अंतराने नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि नागरिकांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनी पाण्याच्या प्रश्नावर महिलांनी आंदोलन सुरू केले असताना ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिलांचा संताप आणखी वाढला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असताना आपली समस्या मांडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातही कोणी उपलब्ध नसल्याबद्दल महिलांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, रास्तारोकोची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर महिलांनी रास्तारोको मागे घेतल्याने अजिंठा महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

दरम्यान, कुसुंब्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


 

Next Post
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add