जळगाव, दि. 12 – जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी सुलोचना जयवंत वाघ यांची फेरनिवड करण्यात आली आहे. दरम्यान महिला काँग्रेसतर्फे त्यांच्या सत्काराचे आयोजन काँग्रेस भवनात करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी महिला काँग्रेसच्या संघटनचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या, तर प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी जिल्ह्यातून साडे तीन हजार महिला बुथप्रमुख म्हणून महिला काँग्रेसतर्फे असतील अशी खात्री दिली.
तसेच अनिता खरारे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा देखील सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी प्रतिभा मोरे -जिल्हाध्यक्ष-अनु जाती महिला विभाग, कांता बोरा – जिल्हा उपाध्यक्ष, राणी खरात – जिल्हा सरचिटणीस, मनीषा पवार – तालुकाध्यक्ष-पाचोरा, अर्चना पोळ – शहराध्यक्ष-चाळीसगाव, अरुणा पाटील, गीतांजली घोरपडे -प्रदेश सदस्य, कल्पना तायडे – तालुकाध्यक्ष-भुसावळ, मानसी पवार – तालुका उपाध्यक्ष-रावेर, जमील शेख – सरचिटणीस-प्रशासन, जिल्हा काँग्रेस, ज्ञानेश्वर कोळी, मनोज चौधरी – तालुकाध्यक्ष-जळगांव तालुका काँग्रेस कमिटी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.