जळगाव, दि. 12 – शहरातील आकाशवाणी चौकात तयार होत असलेल्या सर्कलला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने शंभू पाटील यांनी केली आहे. बुधवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी चौकातील सर्कल येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
सर्कलला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन व गुलाबराव देवकर आप्पा यांनी दिली. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, रंगकर्मी शंभू पाटील, पुरूषोत्तम चौधरी, विनोद देशमुख, मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे हिरालाल चव्हाण, संभाजी बिग्रेडचे खुशाल चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या नियमांचे पालन करत साधेपणाने हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला असल्याचे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे संयोजन प्रमुख शंभु पाटील यांनी सांगितले. सर्कलला जिजाऊ मातेचं नाव देण्यासाठी लवकरच निवेदन देऊन मनपा कडून सदर तांत्रिक बाब पूर्ण करण्यासाठी शिवजयंती समिती पुढाकार घेईल असे देखील त्यांनी सांगितले. विविध संघटना व लोकांना जिजाऊ मातेचे नाव सर्कलला देण्याच्या या प्रस्तवामुळे आनंद झाला आहे . अशी सार्वत्रिक भावना सगळ्यांनी व्यक्त केली .