• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भाजयुमोची ’जागर यात्रा’ उत्साहात संपन्न; हजारो विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

जळगाव, (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे कंटेंट क्रिएशन करणे अत्यंत सोपे झाले आहे. मात्र, या माध्यमाचा मानवी मनावर नकारात्मक परिणामही होत आहे. तरुणांमधील संयम कमी होत असून चिडचिड वाढताना दिसत आहे. अशा काळात अपयश किंवा हार पचविण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. सोशल मीडिया हे केवळ करमणुकीचे साधन नसून त्याचा अत्यंत विचारपूर्वक आणि योग्य वापर करण्याची गरज आहे, असे परखड मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ’जागर यात्रे’निमित्त रविवार, २८ जून रोजी आयोजित भव्य संवाद कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील होते. तर व्यासपीठावर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ केतकी पाटील, दौरा संपर्क प्रमुख तेजस्विनी दुर्गे, भाजपा जिल्हा महामंत्री, भुसावळ उपाध्यक्ष क्रिश कोठारी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राम शिंदे, निलेश पाटील आणि वीरेंद्र उपस्थित होते.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना शाल, श्रीफळ, पुस्तक आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महामंत्री डॉ केतकी पाटील यांनी मनोगतात सांगितले कि, देशातील प्रत्येक तरुण स्वतःचा बौद्धिक, कौशल्याधारित आणि नैतिक विकास करेल, तेव्हाच खर्‍या अर्थाने देशाचा विकास होईल. युवा पिढीने स्वतःला सक्षम बनवून राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी ’एकच मोर्चा, युवा मोर्चा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू यांनी केले, तर अध्यक्षस्थानावरून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन करताना सांगितले की, आजच्या युगात तंत्रज्ञानाला अजिबात घाबरू नका. कृत्रिम बुद्धिमत्ताच्या माध्यमातून आज प्रत्येक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात पुढे जा. आई-वडिलांनी ज्या विश्वासाने आणि हेतूने आपल्याला शिक्षणासाठी पाठविले आहे, त्याचा सदैव आदर राखा. आपले शिक्षण आणि ज्ञान यांचा वापर करून समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित वैद्यकीय, फिझिओथेरपी, होमिओपॅथी, नर्सिंग, आयुर्वेद महाविद्यालयातील व्यवस्थापन विभाग, शिक्षक-शिकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

यूट्यूबच्या कमाईतून समाजकार्य..
’मकोबा’चा प्रभावी वापर आपला अनुभव सांगताना कृष्णराज महाडिक म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करणे खूप कठीण आणि आव्हानात्मक असते. आज तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मी स्वतः ’मकोबा’चा वापर करतो. यूट्यूबच्या माध्यमातून मला मिळणारे पैसे मी स्वतःसाठी न ठेवता, त्यातून समाजासाठी विविध कल्याणकारी कार्ये करण्यास सुरुवात केली आहे. कौटुंबिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी कुटुंब व्यवस्थेवरही आम्ही विशेष काम केले आहे.


 

Next Post
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

'एक भारत.. एक सुर' कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add