• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि संगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा ‘युनिटी इन पॅट्रियोटिझम – एक भारत.. एक सूर..’ हा विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आज ( दि. ३० जून) सकाळी ८ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित केला होता.

याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे कमांडीग ऑफीसर धिरज मिनोत्रा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, डाॅ. अश्विन झाला, रोटरी क्लब जळगाव अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मुख्याध्यापक संघटनेचे राज्यअध्यक्ष जे. के. पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रकल्प प्रमुख ॲड. सागर चित्रे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सहभागी शाळांचा सम्मान करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्रायोजित व रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला गेला. ‘स्वरांतून राष्ट्रप्रेम, गीतांतून एकात्मता’ ही संकल्पनेतून १६ शाळेतील १०००वर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गितांचे सादरीकरण केले. १५० वर्षांचा वारसा असलेल्या वंदे मातरम्… या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या उपक्रमाला विद्यार्थी, युवक, शिक्षक, मुख्याध्यापक, रोटरी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्तीचा अनोखा सांगितीक अनुभव जळगावकरांना आला. अब्दुलभाई यांनी घोषणा देऊन देशभक्तिपर वातावरण निर्मिती केली. रोटरी क्लब जळगाव अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी संचालन केले.

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, ए. टी.झांबरे, झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा, श्रीमती शेवंताबाई टोके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय, श्रीराम विद्यालय मेहरूण, जिजामाता विद्यालय, या. दे. पाटील विद्यालय, बाहेती विद्यालय, जय दुर्गा विद्यालय, शंकुतला जे विद्यालय, पी. के. गुळवे विद्यालय , जे. जे. पंडित हायस्कूल,लोहारा ता. पाचोरा या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभागाबद्दल सम्मान करण्यात आला.

प्रत्येक कृती देशप्रेम ठरावी – धिरज मिनोत्रा
धिरज मिनोत्रा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आईवडिलांचा प्रत्येकाने आदर्श ठेवावा, स्वच्छता असो की आपण करत असलेली कुठल्याही सामान्य कृतीमधून देशप्रेमाला प्राधान्य क्रम दिला पाहिजे. यासाठी बाजारात जाताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर कमी करून आपला देश स्वच्छ सुंदर ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले.

 


 

Next Post
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

ताज्या बातम्या

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add