• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

६१ हजारांचा मुद्देमाल लंपास; चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

जळगाव, विशेष प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावात मध्यरात्री घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले ६१ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मला यशवंत महाजन (वय ४८, व्यवसाय-शेती, रा. नवेगाव, मेहुणबारे, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या मेहुणबारे येथील राहत्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात शिरून कपाटात ठेवलेले दागिने चोरले.

या चोरीमध्ये २८ हजार ६०० रुपये किमतीचा १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, २८ हजार ६०० रुपयांची १३ ग्रॅम वजनाची लहान सोन्याची साखळी आणि ४ हजार ४०० रुपयांचा २ ग्रॅम वजनाचा शुद्ध सोन्याचा तुकडा असा एकूण ६१ हजार ६०० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला.
अज्ञातावर गुन्हा दाखल

सकाळी घरफोडीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निर्मला महाजन यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नंदकिशोर महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

Next Post
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add