• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 22, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

विशेष प्रतिनिधी जळगाव : पाचोरा शहरातील भडगाव रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका ऑटो गॅरेजमधून ७७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश निलेश सोनवणे (वय ३०, व्यवसाय-सलून, रा. बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश सोनवणे हे १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा येथील भडगाव रोडवरील ‘स्वराज ऑटो गॅरेज’ येथे गेले होते. त्यांनी गॅरेजमध्ये ठेवलेल्या एका कापडी पिशवीत ७७ हजार ५०० रुपयांची रोकड (५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटा) ठेवली होती.

दरम्यान, कोणाचेही लक्ष नसताना अज्ञात चोरट्याने ती कापडी पिशवी आणि त्यातील रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादी व त्यांच्या साथीदारांनी २१ ऑगस्टपर्यंत या रक्कमेचा आणि संशयिताचा शोध घेतला; मात्र काहीही सुगावा न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
फिर्यादीच्या अर्जावरून २१ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल शिंपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add