• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 19, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

जळगाव गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुनवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शरीररचनाशास्त्रातील ज्ञानाचे प्रभावी सादरीकरण केले.
शरीररचनाशास्त्र हा वैद्यकीय शिक्षणाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, अभ्यासातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने अ‍ॅनाटॉमी मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी प्रेझेंटेशन आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी शरीराची रचना, विविध अवयवांची वैशिष्ट्ये आणि त्यांची कार्यपद्धती विविध माध्यमांतून सादर केली. वैज्ञानिक माहितीची सांगड कलात्मकतेशी घालत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अधिक समृद्ध करावे आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी, असे प्रोत्साहन त्यांनी दिले.शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी आणि डॉ. मयुरी चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विषयाची सखोल समज विकसित होण्यासोबतच विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्ये वृद्धिंगत होतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.‘अ‍ॅनाटॉमी डे’च्या आयोजनामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले. अभ्यासाला कृतीशील आणि सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शरीररचनाशास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरला.


 

Next Post
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन
खान्देश

शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add