जळगाव, दि. 06 – बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने ‘महाबँक ग्राहक जागरूकता बाईक रॅली’चे आयोजन बुधवारी जळगावात करण्यात आले. या बाईक रॅलीची सुरुवात क्षेत्रिय व्यवस्थापक श्रीमती रश्मीरेखा पती यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून केली.
दरम्यान शहरातील प्रमुख चौकातून जात बँकेच्या जळगाव रोड शाखेत रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली मध्ये बँकेच्या सर्व शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या बाईक रॅलीच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत विविध योजना तसेच रिटेल ग्राहकासाठी बँकेच्या गृह कर्ज, वाहन कर्ज व उद्योजक ग्राहक वर्गासाठी महास्वागतम योजना आदी योजनांबाबत जागरुकता करण्यात आली. यावेळी कोविड संदर्भात दिलेल्या नियमावलीचे पालन करत शिस्त बद्ध पद्धतीने रॅली पार पडली.
बँक ऑफ महाराष्ट्र नेहमी सामाजिक बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असून बँकेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे क्षेत्रिय व्यवस्थापक श्रीमती रश्मीरेखा पती यांनी सांगितले.
तसेच डिजिटल बॅंकिंग, घर व वाहन कर्ज योजनेत कमी असलेल्या व्याजदराचा फायदा घ्यावा असे आवाहन देखील केले.