• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सांगितीक सुरेल मैफलीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2022
in मनोरंजन
0
सांगितीक सुरेल मैफलीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात

जळगाव दि.06 – स्थानिक कलावंतांचे मंगल पवित्र सुरातील शिवतांडव सोत्र, संतुर वादन आणी दुसऱ्या सत्रात कथ्थक भरत नाट्यम् यांच्या जुगलबंदीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात झाली. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्यावतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती महोत्सवाची सुरवात जळगावच्या कलाकारांच्या शिवतांडवाने झाली. ४० कलावंताच्या शिवतांडव उदयोस्तू जयजयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या सोहळ्याचा आरंभ थाटामाटात झाला. नपूर चांदोरकर-खटावकर, कोमल चौव्हाण, हिमानी पिले,दिपीका घैसास यांनी शिवतांडव नृत्य सादर करून दाद मिळवली. यावेळी प्रेक्षकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर मुख्य सांगितीक कार्यक्रमाची सुरवात झाली. कोलकाताचे पं. संदीप चॕटर्जी यांच्या सुंदरवादनाने रसिक मंत्रमृग्ध झाले. सुरवात आलप जोड व झाला ने संदिप घोष यांनी केली. मध्यलयीत रूपक तालात निबध्द राग किरवाणी सादर केला. त्यानंतर द्रृत तीन ताला तील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली व जळगावकर रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली. त्यांना तबल्यावर कोलकाताचे प्रसिद्ध तबलावादक संदिप घोष यांनी साथ केली.

तर दुसऱ्या सत्रात अहमदाबादच्या मानसी मोदी व मानसी करानी यांची कथ्थक व भरत नाट्यम् ची जुगलबंदी कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भरत नाट्यम् व कथ्थक हे भारतीय शास्त्रीय नृत्याचे दोन प्रवाह असून ते आज कलेच्या महासागरात व विलिन झाले. या जुगलबंदिला म्हणूनच ‘संगम’ असे सार्थ शिर्षक मानसी द्वियींनी दिले.

भरत नाट्यम मध्ये पुष्पांजली म्हणजेच फुले असलेले अर्पण यात कथ्थक मधील जटील पद्न्यास आणि चक्रांसह भरत नाटम् मधील जथ्यांसह जटील पद्न्यास यास संगीताशी समक्रमित केले. त्यानंतर प्रसिध्द बालगंधर्व सिनेमातील प्रसिध्द गित ‘मन मंदिरा सादर’ केली. एकल कथक नृत्यात नृत्त समन्वय सादर केला. तर एकल भरत नाट्यम् मध्ये पदमवर आधारित राधा व कृष्ण हे नृत्य सादर केली व शेवटी संत मिराबाई यांचे ‘बरस बरसे बदरिया’ सादर केली.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजीत स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे दीपप्रज्वनाने औपचारिक उद्घाटन झाले.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आयुक्त सतिष कुलकर्णी, नागपूरचे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक शशांक दंडे, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक संजय गुप्ता, युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मनोजकुमार, एलआयसीचे शाखा प्रबंधक चंद्रशेखर आगरकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ.विवेकानंद कुलकर्णी, दिपक चांदोरकर, दिपीका चांदोरकर, अरविंद देशपांडे यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्यावतीने चंद्रशेखर आगरकर यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. दोघंही सत्राच्या कलावंतांचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दिपक चांदोरक यांनी गणेशवंदना सादर केली. दिप्ती भागवत यांच्या सुरेख सुत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत भरली.

Next Post
पत्रकार संरक्षण समितीची तालुका बैठक संपन्न

पत्रकार संरक्षण समितीची तालुका बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त
जळगाव जिल्हा

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

March 26, 2023
औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण
जळगाव जिल्हा

औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

March 25, 2023
आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण
आरोग्य

आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

March 25, 2023
गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

March 25, 2023
कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला
क्रिडा

कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला

March 21, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम

March 21, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.