• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 6, 2022
in जळगाव जिल्हा
0
प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांनी अर्थसाहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव दि.06 प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सकाळी ८ ते ११ या वेळेत बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान करीत आहे. सदर स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर सुमारे ६ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून प्रत्येक स्पर्धकास संस्कृती मंत्रालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहे.

१. रांगोळी काढण्यासाठी तीन तासांचा अवधी असेल.

२. प्रत्येक स्पर्धकास ऑनलाईन नोंदणी (E- Registration) आवश्यक आहे. यासाठी स्वतः चा मोबाईल सोबत आणावा लागेल. बाकीची तांत्रिक मदत प्रतिष्ठान कडून मिळेल.

३. नोंदणी झाल्यावर तीन तासात आपली रांगोळी (ठिपक्या ठिपक्यांची, संस्कारभारती प्रमाणे, पोर्ट्रेट, गालिचा) पूर्ण करून रांगोळी काढतांनाचा फोटो व रांगोळी झाल्यावर रांगोळी सोबतचा फोटो काढून हे फोटो मिनीस्ट्रीच्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे. (यासाठी प्रतिष्ठानतर्फे तांत्रिक मदत मिळेल)

४. रांगोळी काढण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे खडूने स्केच करणे किंवा दोरीच्या साह्याने गोल काढणे यासाठी परवानगी नाही.

५. रांगोळी काढण्यासाठी चार फूट बाय चार फूट (४’ x ४’) चौकोन आपल्याला मिळेल.

६. आपण काढत असलेल्या रांगोळीला लागणारे सर्व सामान व विविध रंगाच्या रांगोळ्या स्पर्धकाने स्वतःच्या खर्चाने आणायच्या आहेत.

७. स्पर्धेच्या दरम्यान शासनाने कोविड – १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार या स्पर्धेचे आयोजन होईल त्यामुळे हात धुवून, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. (स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल) तरी जळगावच्या तमाम रांगोळी कलाकारांना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या वतीने आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त स्पर्धेत स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा व स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिपक चांदोरकर मो. 9422778911 यांच्याशी संपर्क साधावा.


 

Next Post
वाहन, गृहकर्ज हवंय? मग ही बातमी तुमच्यासाठी  VIDEO

वाहन, गृहकर्ज हवंय? मग ही बातमी तुमच्यासाठी VIDEO

ताज्या बातम्या

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!
जळगाव जिल्हा

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!

August 11, 2026
एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण

August 11, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव जिल्हा

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जळगाव जिल्हा

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा
जळगाव जिल्हा

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

August 10, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add