• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!

ओम भोसलेची १७० धावांची वादळी खेळी व्यर्थ; रणजीत निकम सामनावीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 25, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग’ (JCL) मध्ये रविवारी होणाऱ्या महाअंतिम सामन्यासाठी अमळनेर सुहास जायंट्स संघाने थाटात प्रवेश केला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने दिलेले २४२ धावांचे विक्रमी आव्हान अमळनेरने अवघ्या १८.३ षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जळगाव कोगटा किंग्सने २० षटकांत ३ बाद २४२ धावांचा डोंगर उभा केला. यात ओम भोसले याने ७४ चेंडूंत १० षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १७० धावांची ऐतिहासिक नाबाद खेळी केली. अमळनेरकडून केशव ठाकूरने २ बळी घेतले.

विशाल लक्षाचा पाठलाग करताना अमळनेरच्या फलंदाजांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. मानव ट्रिबरेवाल (६४ धावा), रणजीत निकम (७६ धावा) आणि कर्णधार शुभम शर्मा (६५ धावा) यांच्या आक्रमक खेळीमुळे अमळनेरने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकमला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.


​लीगच्या अखेरच्या सामन्यात अमळनेरने पाचोरा एसकेटी योद्धाजचा ६७ धावांनी पराभव करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. आता दुसऱ्या क्वालिफायरचा सामना आज, २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर रंगणार आहे, ज्यातून अंतिम फेरीचा दुसरा संघ निश्चित होईल.


 

Tags: #criket#jalgaon_city#JCL T20#sports
Next Post
दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add