• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

जळगाव, (प्रतिनिधी) : बनावट कॉल सेंटर प्रकरणी गेल्या काही काळापासून कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना आज सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर कोल्हे यांना हा मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ममुराबाद रोडवरील ‘एल. के. फार्म’ या ठिकाणी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी धाड टाकली होती. या फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर चालवून त्याद्वारे विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. या जागेचे मालक म्हणून ललित कोल्हे यांच्यासह इतर संशयितांना पोलिसांनी अटक केली होती.

या अटकेनंतर ललित कोल्हे यांनी जामिनासाठी जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयानेही (हायकोर्ट) त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. अखेर कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

विशेष म्हणजे, मध्यंतरी झालेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी कारागृहात असतानाच निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजयही संपादन केला होता. तेव्हापासून त्यांच्या जामिनाकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
​

Tags: #jalgaon_city#lalitkolheCrimePolice
Next Post
रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

रस्ता सुरक्षा मोहीम: 'कर्कश' सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add