• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

एका सीटी स्कॅन किंवा एमआरआयचीही मिळणार मोफत सुविधा; डॉ. प्रशांत वारके यांची माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील अत्याधुनिक आणि सुपर स्पेशॅलिटी सुविधांनी सज्ज असलेल्या ‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना विविध गंभीर आजारांवर दर्जेदार व पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

​महादेव हॉस्पिटल हे २४ तास सर्व प्रकारच्या आपत्कालीन व वैद्यकीय सेवांसाठी ओळखले जाते. या रुग्णालयात आता महात्मा फुले योजनेअंतर्गत स्पेशॅलिटी, सुपरस्पेशॅलिटी आणि अतिदक्षता विभागातील (ICU) गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयातर्फे एक सीटी स्कॅन (CT Scan) किंवा एमआरआय (MRI) मोफत करण्याची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी आपले रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी), आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आता महागड्या शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी आर्थिक चिंता करण्याची गरज उरणार नाही.

​”आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. हृदयविकार, न्यूरो, हाडांच्या शस्त्रक्रिया, किडनी, कॅन्सर, बालरोग आणि स्त्रीरोग यांसारख्या अनेक गंभीर आजारांवर आम्ही या योजनेतून मोफत उपचार देत आहोत. अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला तत्पर सेवा देणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
– डॉ. प्रशांत वारके (संचालक, महादेव हॉस्पिटल)
​


 

Next Post
JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!

JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत 'अमळनेर सुहास जायंट्स' फायनलमध्ये!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add