• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

जळगाव, (प्रतिनिधी) : दीर्घकाळापासून पोटदुखी व रक्तस्त्रावाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ३७ वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे दीड किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेला मोठा दिलासा मिळाला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील अनिता भिल या ३७ वर्षीय महिला रूग्णाला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला हा त्रास साधारण असल्याचे वाटत असले तरी हळूहळू पोटदुखी वाढू लागली. यासोबतच तिला अनियमित रक्तस्त्रावाची समस्या देखील जाणवत होती. त्रास वाढत असल्यामुळे अखेर महिलेनं जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी संपर्क साधला.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या, डॉ. प्राजक्ता यांच्या टीमने महिलेची सखोल तपासणी केली. त्यानंतर सोनोग्राफीसह विविध प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांदरम्यान महिलेच्या पोटात मल्टीपल फायब्रॉइड असल्याचे निदान झाले. फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयामध्ये तयार होणार्‍या गाठी असून काही वेळा त्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास गंभीर त्रास निर्माण होऊ शकतो.

डॉक्टरांनी तपासणीनंतर रुग्णाच्या प्रकृतीचा बारकाईने अभ्यास केला. गाठींचा आकार मोठा असल्यामुळे औषधोपचाराने फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया करून गाठी काढणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने हिस्टेक्टोमी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयामध्ये तयार झालेल्या अनेक गाठी काढण्यात आल्या. विशेष म्हणजे या गाठींचे एकूण वजन सुमारे दीड किलो इतके होते. शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आणि कोणतीही गुंतागुंत न होता ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली.शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सुधारली आहे. रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर व आधुनिक वैद्यकीय सुविधा यांच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडता आली, असेही डॉक्टरांनी सांगितले.

▪️गर्भाशयातील फायब्रॉइड हा महिलांमध्ये आढळणारा एक सामान्य पण दुर्लक्ष केल्यास गंभीर ठरू शकणारा आजार आहे. पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळीमध्ये अनियमितता किंवा पोटात गाठ असल्याची जाणीव अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा प्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर निदान व उपचार झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.
– डॉ. रश्मी संघवी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add