• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 21, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा शहरात जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

​​दिनांक १९ एप्रिलच्या रात्री ९ ते २० एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान, चोपडा ते धरणगाव रोडवरील पाटचारी जवळ ही घटना घडली होती. संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) यांनी संगनमत करून प्रदिप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) याच्याशी असलेल्या पूर्व वैमनस्यातून त्याचा चेहरा व डोके ठेचून खून केला होता. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​​गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे समजले की, आरोपी मुंबईकडे पळाले आहेत. तातडीने एक पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, आरोपी मुंबईहून पुन्हा रेल्वेने जळगावकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी रणनीती बदलली. ​पोलीस पथकाने नाशिक येथून रेल्वेमध्ये प्रवेश केला आणि धावत्या रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शोध सुरू केला. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान संशयित विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

​सुरवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, मयत प्रदिप महाजन याने आरोपी विजय वैदकर याला पूर्वी दिलेल्या त्रासाच्या रागातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

​ही कामगिरी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने (रविंद्र पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिनवाडे, सुनील दामोदरे, रावसाहेब पाटील, रिजवान शेख) यशस्वीपणे पार पाडली.

Tags: chopdaCrimeJalgaonPolice
Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add