• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 18, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात रिक्षा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त केली आहे.

​दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ मधील पार्किंगमधून MH१९ BJ ४०२५ क्रमांकाची ॲपे रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) याच्याकडे संशयित रिक्षा असल्याची माहिती मिळाली.

​पोलीस पथक त्याच्या शोधात असताना, संशयित कल्पेश हा एम.एस.ई.बी. ऑफिस (पांडे डेअरी चौक) जवळ रिक्षासह पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याने सिव्हिल हॉस्पिटलमधून ही रिक्षा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करून त्याला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ आणि त्यांच्या पथकातील मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर आणि प्रवीण जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोना कमलेश पवार करत आहेत.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add