• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 2, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेंदालाल मिल परिसरातून तीन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​दिनांक २३ ते २५ मार्च दरम्यान गेंदालाल मिल भागातील शेख रईस शेख यांच्या घरातून १०,४०० रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी १) आदील शेख मजीद, २) गुफरान शेख करीम, आणि ३) कासिम सैय्यद अली (सर्व रा. गेंदालाल मिल) यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून डॉआंबेडकर रिक्षा स्टॉप परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.

​पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
​रोकड: १०,००० रुपये (५०० च्या २० नोटा)
​चांदी: ४ चांदीच्या अंगठ्या (४०० रु.) आणि ९७ ग्रॅमचे पैंजण (५,५०० रु.)
​सोने: १.९७० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (१४,००० रु.)
​या कारवाईमुळे शहरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी, स.पो.नि. सुरेश आव्हाड, सुनील पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दीपक शिरसाठ, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांच्या पथकाने केली.

Tags: #jalgaon_cityCrimePolice

ताज्या बातम्या

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद
गुन्हे

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

April 2, 2026
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार
जळगाव जिल्हा

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

April 2, 2026
धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!
जळगाव जिल्हा

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

April 1, 2026
सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

April 1, 2026
मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव
क्रिडा

मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

March 31, 2026
जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप

March 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group