• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 3, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड आता निश्चित झाली आहे. महायुतीच्या वतीने त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, आज मंगळवार (३ फेब्रुवारी) रोजी दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत गणरायाचे दर्शन घेतले.

​आरोग्य आणि कर्तव्याची सांगड..
दीपमाला काळे यांना सायकलिंगची प्रचंड आवड असून त्या आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असतात. महापौर पदाची मोठी जबाबदारी खांद्यावर येण्यापूर्वी त्यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’ असा संदेश देत सायकलने पद्मालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​शहराच्या विकासासाठी साकडे..
पद्मालय येथील गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेसाठी आपल्याला बळ मिळावे, असे साकडे गणरायाला घातले. यावेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड निश्चित झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

​६ तारखेला होणार अधिकृत घोषणा..
महापौर पदासाठी महायुतीकडून केवळ दीपमाला काळे यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. या निवड प्रक्रियेची अधिकृत घोषणा येत्या ६ तारखेला होणार असून, जळगावला एक ‘फिट’ आणि कार्यक्षम महापौर मिळणार असल्याची भावना सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

Next Post
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group