• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 3, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील काशिनाथ चौक परिसरातून चोरलेली दुचाकी शोधण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीची ‘सुपर स्प्लेंडर’ मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

धानोरा खु. (ता. जळगाव) येथील रहिवासी शालिक पाटील हे आपल्या कामासाठी जळगाव शहरात आले होते. त्यांनी आपली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर (क्र. एम एच १९ ए के ०२०७) काशिनाथ चौक परिसरात पार्क केली होती. सामान खरेदी करून परतल्यानंतर त्यांना आपली दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली. गुप्त बातमीदार आणि यावल पोलीस स्टेशनचे पोनि रंगनाथ धारबळे व त्यांच्या पथकाच्या मदतीने संशयित आरोपी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) याला १ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. ​पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे वाहन जप्त केले आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बबन आव्हाड, पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, गणेश ठाकरे, राहुल घेटे आणि योगेश घुगे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे हे करत आहेत.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add