• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

​जळगाव/भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत दोन्ही मुली साकरी गावातीलच रहिवासी असून त्या शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, गावाजवळील एका विहिरीजवळ त्यांना गाठून संशयित आरोपीने विहिरीत ढकलून दिले. यात दोन्ही चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

​आरोपी पोलिसांच्या ताब्यात; ग्रामस्थांचा संताप..
​पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला तातडीने ताब्यात घेऊन भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नेले आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत संतप्त जमावाने पोलिसांशी वाद घातला. यामुळे पोलीस ठाणे आणि साकरी गाव परिसरात मोठी गर्दी जमली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली.

​घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मात्र, मृतदेह बाहेर काढण्यास आणि पुढील प्रक्रियेस विलंब होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. ‘आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा’, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

​संशयित आरोपी रोहन चौधरी याने हे टोकाचे पाऊल का उचलले? मुलींशी त्याचे काय नाते किंवा वाद होता? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. या घटनेने साकरी गावावर शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
​

Tags: BhusawalCrimeJalgaonPolice
Next Post
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

ताज्या बातम्या

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add